
नाशिक मध्ये होणार असलेल्या कुंभमेळ्याची सगळीकडे चर्चा होती आणि आतुरता होती. पण आता याच कुंभमेळ्या मुळे निसर्गाची हानी होताना दिसत आहे. याच कुंभमेळ्यासाठी नाशिक मध्ये असलेल्या २०० ते ३०० वर्षांपूर्वी च्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन आणि गंगापूर रोड परिसरात १८०० हून अधिक झाडांची कत्तल सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. रस्ता रुंदीकरण आणि साधुग्राम उभारणीसाठी शतकाहून जुनी झाडे तोडली जात असून, राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) स्थगिती दिलेली असतानाही काम सुरू असल्याचा आरोप आहे.
कुंभमेळ्याची तयारी: भक्तीचा सोहळा की निसर्गाचा बळी?
नाशिक आणि कुंभमेळा हे समीकरण अतूट आहे. दर १२ वर्षांनी येणारा हा सोहळा नाशिकच्या वैभवात भरच टाकतो. पण यंदा या सोहळ्याची किंमत नाशिकच्या ’हिरवाईने’ मोजावी लागत आहे. सिंहस्थ आराखड्यानुसार भाविकांच्या सोयीसाठी रस्ते रुंदीकरण, पार्किंग आणि नवीन रिंग रोड प्रस्तावित आहेत, ज्यासाठी हजारो पुरातन वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जात आहे.
नाशिकच्या तपोवन, पंचवटी आणि मखमलाबाद यांसारख्या भागांत, जिथे दाट झाडी होती, तिथे आता केवळ सिमेंटचे रस्ते दिसत आहेत. इथे वटवृक्ष, पिंपळ आणि कडुनिंबाची झाडे होती जी ५०-१०० वर्षांपासून सावली देत होती, ती काही तासांत जमीनदोस्त केली जात आहेत. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवनमध्ये ५४ एकर जमिनीवर साधुग्रामसाठी १७००-१८०० झाडे तोडण्याचे नियोजित आहे. गंगापूर रोडवरही ३००-५०० वर्षे जुनी झाडे कापली गेल्याने स्थानिकांनी विरोध केला आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) वृक्षतोडीवर तात्पुरती मनाई केली आहे आणि २८ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. तरीही काही ठिकाणी काम सुरू असल्याच्या तक्रारीनंतर याचिकाकर्त्यांनी पालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.

देवाने निसर्ग बनवला आहे मग याच देवाला ही वृक्षतोड, ही निसर्गाची हानी मान्य होईल का? एवढा तरी या लोकांनी विचार करावा. हे उद्या कितीही झाडे लावतील त्यातली किती जगातील वाढतील माहिती नाही. पण आज या इतक्या जुन्या झाडांची कत्तल करून त्याची भरपाई होऊच शकत नाही.
या आधी देखील अशीच कत्तल केली गेली होती मुंबई तील आरे कॉलनीत. अजूनही लोक फक्त मोर्चे काढतायेत आंदोलनं करत आहेत. पण याच या झाडे तोडणाऱ्यांवर किंवा त्याची अनुमती देणाऱ्यांवर काहीच परिणाम होत नाही असे दिसत आहे. मग लोकांनी सरकारच्या अशा कृत्यावर हिंसक विचार करावा का की जेणेकरून ही निसर्गाची हानी थांबेल.
तुम्हाला काय वाटतं याबद्दल ?

