
आजच्या डिजिटल युगात “AI” म्हणजेच Artificial Intelligence हा शब्द आपण खूप ऐकतो. AI मुळे सगळ्या गोष्टी कश्या सोप्या होऊन गेल्या आहेत. पूर्वी … फार पूर्वी नाही AI येण्याच्या आधी आपल्याला काही माहिती हवी असायची तर आपण कोण्या अनुभवी व्यक्तीला विचारायचो किंवा काही हेल्थ विषयी विचारायचे झाले तर आजीच्या किंवा आईच्या बटव्याचा वापर करायचो. काही माहिती हवी असेल तर आपण आपले Google सर्च करायचो… पण आता जग याही पेक्षा पुढे गेले आहे AI आल्यामुळे.
पण हे AI म्हणजे काय ?
AI (Artificial Intelligence) म्हणजे संगणक किंवा मशीनला माणसासारखी विचार करण्याची, शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणे. मशीन स्वतः डेटा पाहून शिकते आणि त्यानुसार काम करते. म्हणजेच एखाद्या रोबोटला मानवी साच्यात बसवून मानवाप्रमाणे विचार करायला सांगणे.
AI काय करू शकतं?
भाषा समजून घेणं – AI ला आपण आपल्या भाषेत विचारू शकतो. जसे की आपण आपल्या मित्राशी आपल्या भाषेत काही गप्पा मारतोय तसे.
फोटो/व्हिडिओ ओळखणं- AI मशीनला फोटो किंवा व्हिडिओ “पाहून” त्यात काय आहे हे ओळखता येणं. जर आपल्याला एखादी गोष्ट ती काय आहे हे माहिती नसेल आणि तिचा फोटो काढून आपण AI ला दाखवून आपण त्याची माहिती मिळवू शकतो.
डेटा पाहून निर्णय घेणं- AI ला दिलेल्या माहितीवर (data) आधारित योग्य निष्कर्ष काढणं किंवा पुढचं action ठरवणं. सोप्या भाषेत आपल्या मोबाईल मध्ये weather report दिसते म्हणजेच आज खूप उन आहे की ढगाळ वातावरण आहे हे दिसते. आणि असे असल्यास तुम्ही काय करू शकता म्हणजेच पाऊस पडणार असेल तर छत्री घेऊन जा किंवा खूप उन असल्यास तोंडाला मास्क लावा असे AI तुम्हाला सांगते.
स्वतः अनुभवातून शिकणं – सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा AI चालू झाले तेव्हा ते इतके बिनचूक नव्हते. AI च्या देखील चुका होयच्या. पण आता तसे नाहीये माणसासारखेच AI देखील आपल्या चुकांतून शिकते आणि जास्तीत जास्त बिनचूक माहिती आपल्याला देण्याचा पर्यंत करते.
ऑटोमेशन (Automation) – ऑटोमेशन म्हणजे मशीन किंवा सॉफ्टवेअर हे स्वतः मानवाच्या मदतीशिवाय आपोआप काम करणं.हल्ली AI इतके प्रगत झाले आहे की ते स्वतः आपोआप (automaticaly) काम करते. जसे की factory मध्ये रोबोट्स स्वतः कार assemble करतात. आणि आता तर AI स्वतः गाडी देखील चालवतात.
हेच AI वापरून नवनवीन ॲप्स, software बनवले जातात त्यांनाच AI Tools म्हणतात.AI Tools म्हणजे काय? AI Tools म्हणजे AI वापरून तयार केलेली अशी साधनं म्हणजेच software किंवा apps जी आपलं काम सोपं आणि जलद करतात. आता सध्या AI videos किंवा photos खूप चर्चेत आहेत आणि ते खूप छान आणि मजेशीर देखील वाटतात. हे सर्व AI Tools चा वापर करून बनवलेले असतात. या AI Tools चा उपयोग करून फक्त videos किंवा photos यासाठीच नाही तर content writing, grammar writing , voice editing, coding आणि अशा बऱ्याच कामांसाठी केला जातो.
मग हे AI Tools कोणते?

Writing म्हणजेच लिखाणासाठी ChatGPT, Google Gemini, Grammarly
इमेज किंवा डिझाइन बनवण्यासाठी DALL·E, Canva, Midjourney
Videos editing किंवा बनवण्यासाठी Pictory, Synthesia
कोडिंग करण्यासाठी GitHub Copilot , Codeium
Audio / voice एडिटिंग करण्यासाठी ElevenLabs , Descript
Business / Productivity साठी Notion AI , Jasper
हे AI किंवा AI Tools यांनी आपली कामे खूप सोपी आणि कमी वेळात, कमी खर्चात करून दिली खरी पण याच tools मुळे कितीतरी लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली.

