Cloud Computing बद्दल ऐकले आहे का ?

Cloud computing

सध्या AI चा जमाना आहे. सगळेच जग आता AI मय होऊन गेले आहे. जिथे AI वापरून आपण नवनवीन गोष्टी बनवत आहोत. पण या नवनवीन गोष्टी साठवायला जागा पण तेवढीच लागते. मग आपला स्टोअरेज सारखा सारखा भरून जातो. मग आपण तो डाटा मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर फाइल्स साठवण्याऐवजी, ते इंटरनेटवर असलेल्या रिमोट सर्व्हरवर साठवतो आणि तिथूनच ते वापरतो याला ‘क्लाउड कॉम्प्युटिंग’ cloud computing म्हणतात.सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे आपण आपले फोटो फोन मध्ये ठेवतो तेच google drive मध्ये पण साठवून ठेवतो आणि वापरतो.

तांत्रिक भाषेत Cloud Computing म्हणजे काय?

Cloud Computing म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून डेटा स्टोरेज, सॉफ्टवेअर आणि सर्व्हरचा वापर करणे. थोडक्यात काय तर इंटरनेटद्वारे सर्व्हर, स्टोरेज, डेटाबेस, नेटवर्किंग आणि सॉफ्टवेअर यांसारख्या संगणकीय सेवांची उपलब्धता उपभोगाने. यामध्ये तुमचा डेटा तुमच्या डिव्हाइसवर न राहता इंटरनेटवरील सर्व्हरवर साठवला जातो.

Cloud Computing कसे काम करते?

जेव्हा तुम्ही क्लाउड सेवा वापरता तेव्हा तुम्ही तुमचा डेटा प्रत्यक्ष हार्ड ड्राइव्हवर सेव्ह करत नाही. त्याऐवजी, तो डेटा Google, Amazon किंवा Microsoft सारख्या कंपन्यांच्या मोठ्या डेटा सेंटर्समध्ये साठवला जातो. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून इंटरनेटच्या मदतीने तो डेटा एक्सेस करू शकता.

Cloud computing ची रोजच्या जीवनातील उदाहरणे

• Google Drive / iCloud: तुमचे फोटो आणि डॉक्युमेंट्स ऑनलाइन सेव्ह करणे.

• YouTube / Netflix: व्हिडिओ डाउनलोड न करता थेट इंटरनेटवर पाहणे.

• Gmail / Outlook: ईमेल सेवा वापरणे.

• Social Media: फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करणे.

Cloud computing चे मुख्य प्रकार

Cloud computing चे प्रकार
Cloud computing चे प्रकार

• Infrastructure as a Service (IaaS): हे सर्वात मूलभूत मॉडेल आहे. इथे तुम्हाला “रिकामा कॉम्प्युटर/सर्व्हर” भाड्याने मिळतो.तुम्हाला त्यावर कोणते ऑपरेटिंग सिस्टम (Windows किंवा Linux) टाकायचे आहे हे तुम्ही ठरवता.उदाहरण: Amazon Web Services (AWS), Microsoft Azure

• Platform as a Service (PaaS): हे सॉफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी असते. इथे त्यांना कोडिंग करण्यासाठी लागणारे प्लॅटफॉर्म आणि टूल्स तयार मिळतात.त्यांना सर्व्हर मॅनेज करण्याची चिंता नसते, फक्त आपले ॲप बनवण्यावर लक्ष द्यायचे असते. उदाहरण: Google App Engine, Heroku.

• Software as a Service (SaaS): यामध्ये तयार सॉफ्टवेअर इंटरनेटवर वापरण्यासाठी दिले जाते. तुम्हाला काहीही इंस्टॉल करण्याची गरज नसते. उदाहरण: Google Docs, Zoom, WhatsApp Web.

क्लाउड कुठे आणि कसा सेटअप केला आहे, त्यानुसार त्याचे प्रकार पडतात:

• Public Cloud: हे सर्वांसाठी उपलब्ध असते. (उदा. Google Drive). यात सुरक्षा चांगली असते पण रिसोर्सेस शेअर केलेले असतात.

• Private Cloud: हे एखादी मोठी कंपनी फक्त स्वतःच्या कर्मचाऱ्यांसाठी बनवते. हे अत्यंत सुरक्षित असते.•

Hybrid Cloud: जेव्हा एखादी कंपनी पब्लिक आणि प्रायव्हेट अशा दोन्ही क्लाउडचा वापर करते, तेव्हा त्याला हायब्रीड म्हणतात.

• Community Cloud: जेव्हा समान उद्दिष्ट असलेले काही गट (उदा. अनेक बँका मिळून) एक क्लाउड वापरतात.

Cloud computing चे तांत्रिक फायदे

* Disaster Recovery: जर तुमचा मुख्य डेटा सेंटर भूकंप किंवा आगीमुळे नष्ट झाले, तरी क्लाउडवर तुमचा डेटा दुसऱ्या भौगोलिक ठिकाणी सुरक्षित असतो.

* Auto-scaling: ट्रॅफिक वाढले की सर्व्हरची ताकद आपोआप वाढते.

* Security: मोठ्या क्लाउड कंपन्यांकडे डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तज्ज्ञांची मोठी टीम असते, जी सामान्य माणसापेक्षा जास्त चांगली सुरक्षा देऊ शकते.समजा तुमची एक ई-कॉमर्स वेबसाईट आहे.आधी तुम्हाला स्वतःचे मोठे सर्व्हर विकत घ्यावे लागायचे, त्यासाठी एसी रूम (Server Room) लागायची आणि ते सांभाळायला इंजिनिअर्स लागायचे. दिवाळीच्या सेलमध्ये गर्दी वाढली की तुमची वेबसाईट क्रॅश व्हायची. पण आता असे होत नाही. तुम्ही फक्त क्लाउडवर जागा भाड्याने घेता. सेलच्या काळात ट्रॅफिक वाढले की क्लाउड आपोआप जागा वाढवतो आणि सेल संपला की पुन्हा कमी करतो. यामुळे तुमचे पैसे वाचतात आणि टेन्शनही कमी होते.Cloud computing मुळे तुम्हाला स्वतःचे महागडे सर्व्हर किंवा हार्डवेअर खरेदी करण्याची गरज नसते. तुम्ही जितकी सेवा वापरता, तितकेच पैसे द्यावे लागतात. इंटरनेट असल्यास तुम्ही मोबाइल, लॅपटॉप किंवा टॅबलेटवरून तुमचा डेटा कधीही पाहू शकता. तुमचा फोन किंवा कॉम्प्युटर खराब झाला, तरी तुमचा डेटा सुरक्षित राहतो कारण तो क्लाउडवर सेव्ह असतो. तुम्हाला हवे तितके स्टोरेज स्पेस वाढवता येते.

तुम्हाला हा लेख कसा वाटला नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *