
सध्या IPL चे दिवस चालू आहेत. रोज कोणती ना कोणती टीम जिंकते आणि समोरची टीम हरते. सध्या, पंजाब किंग्स (PBKS) सर्वात पुढे आहे. भारतीय उपखंडात क्रिकेट हा केवळ खेळ राहिला नसून ते नसानसांत वाहणारे रक्त बनले आहे आणि जेव्हा बात आयपीएलची (IPL) येते, तेव्हा हा उत्साहाचा बीपी हाय लेवल ला पोहोचतो . २००८ मध्ये जेव्हा ‘ललित मोदी’ यांनी आयपीएलची संकल्पना मांडली तेव्हा ती एवढी चालेल असे कोणालाच वाटले नव्हते. IPL मधील प्रत्येक टीमची स्वतःची ओळख आहे—त्यांचे नाव, जर्सी, खेळाडू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोगो (Logo). आता या लीग ला १८ वर्षे पूर्ण होत आहेत. या १८ वर्षात IPL मध्ये बरेच बदल झाले. इंडियन प्रीमियर लीग (IPL) म्हणजे केवळ क्रिकेटचा खेळ नाही, तर तो एक प्रचंड मोठा ‘ब्रँड’ झाला आहे. गेल्या १७-१८ वर्षांत आयपीएलमध्ये अनेक बदल झाले. खेळाडू बदलले, नियम बदलले, अगदी टीमची मालकीही बदलली. काहींनी आपले लोगो (Logo) ही बदलले .
IPL मध्ये टीम चा लोगो म्हणजे टीम ची ‘ ओळख’ असे आहे. लोगो म्हणजे फक्त एक डिझाइन नाही; तो टीमचा चेहरा असतो. तो त्या टीमची संस्कृती, ताकद आणि चाहत्यांशी असलेला भावनिक संबंध दाखवतो. पण गेल्या काही वर्षांत अनेक टीम्सनी आपले लोगो बदलले, तर काही टीम्सने आपली मूळ ओळख कायम ठेवली आहे. अनेक टीम्स ने आपल्या लोगो मध्ये काही न काही बदल केले पण अशी एक टीम आहे जिने या १८ वर्षात एकदाही लोगो बदलला नाही किंवा थोडेही changes केले नाहीत.
IPL मध्ये कोणत्या टीमने लोगो बदलला नाही ?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे चेन्नई सुपर किंग्स (CSK). चेन्नई सुपर किंग्ज ही IPL मधील अशी एकमेव टीम आहे जिने आपल्या लोगो (Logo) मध्ये जराही बदल केला नाही. जसे की आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की CSK चेन्नई सुपर किंग्ज चा लोगो गर्जणारा सिंह ( Roaring Lion) हाच आहे.

इतकी वर्ष होऊन देखील CSK ने त्यांची Brand Identity कायम ठेवली. २००८ पासून आजपर्यंत चेन्नई सुपर किंग्सचा लोगो एकच आहे—गर्जणारा पिवळा सिंह. या लोगोमध्ये केशरी रंगाची आयाळ असलेला सिंह आणि निळ्या अक्षरात लिहिलेले ‘Chennai Super Kings’ हे समीकरण चाहत्यांच्या मनावर कोरले गेले आहे.
CSK ने त्यांच्या logo मध्ये बदल का केला नाही?
१. ब्रँड लॉयल्टी: टीम चा लोगो (Logo) म्हणजे टीम ची ओळख आहे आणि ही त्यांची ओळख त्यांच्या चाहत्यांशी जोडलेली आहे असा विश्वास चेन्नईच्या व्यवस्थापनाचा आहे . त्यामुळे वारंवार लोगो बदलल्याने चाहत्यांचा भावनिक जोडावा विचलित होऊ शकतो.
२. महेंद्रसिंग धोनी फॅक्टर: धोनी जेवढ्या शांत स्वभावाचा आहे तितक्याच शांततेने आणि स्थिरतेने त्याने या संघाचे नेतृत्व केले आहे. तीच स्थिरता या संघाच्या लोगोमध्येही दिसते.
३. यशाचे सातत्य: सहसा संघ तेव्हा लोगो बदलतात जेव्हा त्यांना नवीन सुरुवातीची गरज असते किंवा ते अपयशी ठरत असतात. चेन्नईने सुरुवातीपासूनच यशाची चव चाखली आहे, त्यामुळे त्यांना ‘रिब्रँडिंग’ची गरज भासली नाही.
टीम्स लोगो का बदलतात ?
टीम्स लोगो बदलण्यामागे काही कारणे असतात:काही टीम ब्रँडिंग सुधारण्यासाठी लोगो बदलतात. तर नवीन ओळख निर्माण करण्यासाठी देखील काही टीम्स नी लोगो बदलला. काही टीम्सने modern look साठी logo redesign केला.
कोणत्या टीम ने लोगो मध्ये काय बदल केले
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)– आरसीबी (RCB ) हा आयपीएलमधील असा संघ आहे ज्याचा चाहता वर्ग सर्वात मोठा आहे, पण तरीही त्यांच्या लोगोमध्ये अनेकदा बदल पाहायला मिळाले आहेत. २००८ मध्ये आरसीबीचा लोगो वर्तुळाकार होता ज्यामध्ये ‘विजय मल्ल्या’ यांच्या युनायटेड स्पिरीट्सचा प्रभाव होता. २०१६ आणि २०२० मध्ये संघाने आपला लोगो अधिक आधुनिक करण्यासाठी वाघाचे (Lion/Tiger Motif) डिझाइन स्वीकारले. २०२४ मध्ये संघाने आपल्या नावात ‘Bangalore’ ऐवजी ‘Bengaluru’ असे अधिकृत बदल केले आणि त्यासोबतच लोगोचा रंग आणि डिझाइनमध्येही बदल केला. कारण आरसीबी नेहमीच ‘नवीन ऊर्जा’ आणि ‘स्टाईल’ यावर भर देते. प्रत्येक वेळी नवीन लोगो आणून ते चाहत्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

मुंबई इंडियन्स (MI)- मुंबई इंडियन्सने सुरुवातीच्या काही वर्षांत त्यांच्या लोगोमध्ये किरकोळ बदल केले होते. त्यांचा मूळ लोगो ‘सुदर्शन चक्र’ कायम ठेवला आहे. सुरुवातीला हा लोगो थोडा वेगळ्या शेडमध्ये होता. पण २०१० नंतर त्यांनी तो अधिक उठावदार आणि गडद निळ्या-सोनेरी रंगात स्थिरावला.

दिल्ली कॅपिटल्स (DC)- सुरुवातीला उडणाऱ्या चेंडूचा लोगो होता. पण अनेक वर्षे अपयश आल्यानंतर, २०१९ मध्ये संघाने आपले नाव बदलून ‘दिल्ली कॅपिटल्स’ केले. त्यांनी ‘तीन सिंह’ असलेला लोगो स्वीकारला, जो भारताच्या संसदेच्या वास्तूशी आणि शक्तीशी संबंधित आहे. या बदलानंतर संघाच्या कामगिरीतही मोठी सुधारणा पाहायला मिळाली.

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) – KKR यांनी आपल्या लोगो मध्ये रंगांचा बदल केला. त्यांनी सुरुवातीला ‘ब्लॅक अँड गोल्ड’ ही थीम ठेवली होती. पण मग २०१२ मध्ये संघाने आपला लोगो बदलून ‘पर्पल अँड गोल्ड’ (जांभळा आणि सोनेरी) असा केला.विशेष म्हणजे, ज्या वर्षी त्यांनी लोगो आणि जर्सीचा रंग बदलला, त्याच वर्षी त्यांनी पहिले विजेतेपद पटकावले. यामुळे त्यांचा हा बदल नशिबाच्या दृष्टीने अत्यंत यशस्वी ठरला.

पंजाब किंग्स (PBKS) – पंजाब किंग्स नी नावातच बदल केले. आधी ‘किंग्स इलेव्हन पंजाब’ (KXIP) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संघाने २०२१ मध्ये आपले नाव बदलून ‘पंजाब किंग्स’ असे केले. जुन्या लोगोमध्ये दोन सिंह समोरासमोर होते, तर नवीन लोगोमध्ये एकाच मोठ्या सिंहाची आकृती असून ती अधिक आक्रमक दिसते. संघाने ब्रँड रिफ्रेश करण्यासाठी आणि एका नवीन ओळखीसह मैदानात उतरण्यासाठी हा निर्णय घेतला होता.

राजस्थान रॉयल्स (RR) – २००८ चा पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्स हा होता. पूर्वी निळे निळे दिसणारे राजस्थान रॉयल्स निळ्याकडून गुलाबीकडे वळले.जयपूरच्या ‘पिंक सिटी’ या ओळखीला प्राधान्य देत आपली पूर्ण थीम त्यांनी ‘गुलाबी’ केली.

सनरायझर्स हैदराबाद (SRH) – आताचे सनरायझर्स हैदराबाद म्हणजेच आधीचे डेक्कन चार्जर्स ज्याचा लोगो होता धावणारा बैल. पण २०१३ मध्ये सन समूहाने टीम विकत घेतल्यावर ‘सनरायझर्स हैदराबाद’ हा नवीन ब्रँड उदयास आला, ज्याचा लोगो ‘उगवता सूर्य’ आणि ‘गरुड’ यांचे मिश्रण आहे.

गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स – हे नवीन संघ असल्याने त्यांनी सुरुवातीलाच आधुनिक डिझाइनचे लोगो निवडले आहेत.

आयपीएलच्या जगात लोगो हा केवळ एक डिझाइनचा भाग नसून तो त्या संघाचा आत्मा असतो. चेन्नई सुपर किंग्सने आपला लोगो न बदलून हे सिद्ध केले आहे की, त्यांचा त्यांच्या वारशावर आणि प्रक्रियेवर किती गाढ विश्वास आहे. दुसरीकडे, इतर संघांनी बदल स्वीकारून हे दाखवून दिले की, ते काळानुसार आणि चाहत्यांच्या आवडीनुसार स्वतःला बदलण्यास तयार आहेत. टीम ने लोगो बदलो या न बदलो यावर त्या टीम चे यश अवलंबून नसते. ती टीम मैदानात कशी खेळते यावर त्या टीम चे यश अवलंबून असते.
हा लेख तुम्हाला कसा वाटला ते सांगा.
