
सध्या IPL चा सिझन चालू आहे. मैदानावर षटकार आणि चौकारांचा पाऊस पडत असतानाच, गेल्या काही काळापासून प्रेक्षकांचे लक्ष एका विशेष चिन्हाने वेधून घेतले आहे ते म्हणजे झाडाच्या चिन्हाने 🌳. आयपीएल (IPL) च्या सामन्यांदरम्यान जेव्हा एखादा गोलंदाज ‘डॉट बॉल’ (ज्यावर एकही धाव मिळत नाही) टाकतो, तेव्हा टीव्ही स्क्रीनवर धावसंख्येच्या जागी झाडाचे चिन्ह 🌳 (Tree icon) दाखवले जाते. पहिल्यांदा बघितलं तेव्हा वाटलं असेल, “हे काय नवीन आहे? बॉल डॉट गेला म्हणून झाड? क्रिकेटचा आणि झाडाचा संबंध काय?”
तर मित्रांनो, हा एक असा उपक्रम जिथे प्रत्येक डॉट बॉल साठी एक झाड लावलं जातं. हो, खरंच. Indian Premier League मध्ये काही सीझन्सपासून एक ग्रीन इनिशिएटिव्ह चालवला जातो. IPL चं ”Dot Ball Trees” कॅम्पेन.
२०२६ च्या IPL मध्ये हा उपक्रम अजून मोठा झालाय. या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत:
ही आयडिया आली कुठून, कोण झाडं लावतं, आतापर्यंत किती झाडं लागली, आणि एक डॉट बॉल पर्यावरणाला कसा मदत करतो.
१. “IPL Dot Ball Campaign” ची सुरुवात कधी आणि कशी झाली?
आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. या लोकप्रियतेचा वापर पर्यावरणाच्या हितासाठी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टाटा समूहासोबत (TATA Group) एक विशेष करार केला. या मोहिमेला ‘ग्रीन क्रेडिट्स’ (Green Credits) किंवा वृक्षारोपण मोहीम म्हटले जाते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश क्रिकेटच्या माध्यमातून पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे हा आहे.
लॉजिक काय होतं?
IPL हा जगातला सगळ्यात जास्त बघितला जाणारा T20 लीग आहे. एका सिझनमध्ये ७० हून अधिक मॅच खेळल्या जातात, २५,००० पेक्षा अधिक बॉल टाकले जातात. त्यातले ४०% म्हणजे जवळपास १०,००० बॉल डॉट असतात.१ डॉट बॉल = ५०० झाड म्हणजे आतापर्यंत IPL च्या डॉट बॉल मधून जवळ जवळ ५,००,००० हून अधिक झाडे लावली गेली.
२. पण डॉट बॉलच का? सिक्सर किंवा विकेट का नाही?
हा प्रश्न सगळ्यांना पडतो. सिक्सर मारला तर झाड लावलं असतं तर जास्त मजा आली असती ना? यामागे 3 स्मार्ट कारणं आहेत:
कारण १: डॉट बॉल = बॉलरचा इफेक्ट – T20 क्रिकेट बॅट्समनचा गेम मानला जातो. सिक्सर, फोरचं कौतुक होतं. पण बॉलरने सलग डॉट बॉल टाकणं हे खूप स्किलचं काम आहे. त्याला “इकोनॉमिकल स्पेल” म्हणतात. झाडाचं चिन्ह देऊन BCCI ने मेसेज दिला: “डॉट बॉल टाकणं हे पण हिरोगिरी आहे.” त्यामुळे जसप्रीत बुमराह, राशिद खान सारख्या बॉलर्सना आणखी प्रोत्साहन मिळतं.
कारण २: डॉट बॉल सगळ्यात जास्त असतात – एक T20 इनिंगमध्ये सरासरी ४० ते ५० डॉट बॉल असतात. विकेट ५ ते ८ पडतात, सिक्सर १०-१५ लागतात. सिक्सर पेक्षा डॉट बॉल जास्त असतात. त्यामुळे सिक्सर वर जर झाडे लावली तर कमी झाडे लागतील. म्हणून डॉट बॉल वर झाडे लावायचे ठरवले.
कारण ३: सायकॉलॉजिकल कनेक्शन – “Dot” म्हणजे शून्य. शून्य म्हणजे रिकामा. पण निसर्गात “रिकामा” काहीच नसतं. जिथे काहीच नाही, तिथे आपण झाड लावू शकतो. म्हणजे क्रिकेटचा “रिकामा बॉल” निसर्गात “हिरवळ” बनतो. हे कनेक्शन पब्लिकला लगेच समजतं. मार्केटिंगचा मास्टरस्ट्रोक.
३. डॉट बॉल ची ही झाडं लावतो कोण? आणि कुठे लावली जातात?

टीव्हीवर झाडाचं चिन्ह दाखवणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात एवढी झाडं लावणं हे मोठं ऑपरेशन आहे.
कोण करतं हे काम? IPL चा ऑफिशियल “Green Partner” असतो. २०२३ ते २०२५ Tata ने हे काम केलं. २०२६ पासून “Jio Forest” आणि “Reliance Foundation” मिळून करत आहेत. त्यांची टाय-अप असते Grow-Trees.com, SankalpTaru Foundation, SayTrees सारख्या NGO सोबत. या NGO चं कामच आहे भारतभर वृक्षारोपण करणं.
डॉट बॉल प्रमाणे झाडे मोजण्याची प्रोसेस कशी असते?
१. IPL मॅच संपली की त्या दिवशीचे टोटल डॉट बॉल काउंट होतात. समजा MI vs CSK मध्ये 87 डॉट बॉल.
२. BCCI तो डेटा Green Partner ला देतो.
३. Green Partner, NGO ला फंड देतो: “८७ झाडं लावा”. एका झाडामागे सरासरी ५०-८० रु खर्च येतो.
४. NGO पुढचे ३० दिवसांत ती झाडं लावतात. फोटो, GPS लोकेशन, रिपोर्ट BCCI ला सबमिट करतात.
५. IPL च्या वेबसाईटवर “Dot Ball Tree Counter” लाइव्ह अपडेट होतो.
झाडं कुठे लावतात?
ही झाडे आंधळेपणाने कुठेही लावायची म्हणून लावली जात नाही. तर NGO इकॉलॉजिस्टला विचारून ठरवतात कुठे लावायची ते आणि कोणत्या प्रकारची झाडे लावायची ते:
– राजस्थान, गुजरात: कमी पाऊस, तिथे दुष्काळ-प्रतिरोधक झाडं – कडुलिंब, बाभूळ.
– उत्तराखंड, हिमाचल: Landslide-prone एरिया, तिथे बांध धरून ठेवणारी झाडं – ओक, देवदार.
– महाराष्ट्र, कर्नाटक: शेतकऱ्यांच्या बांधावर फळझाडं – आंबा, चिंच, आवळा. त्यामुळे शेतकऱ्याला ५ वर्षांनी इनकम पण मिळतं.
– शहरी भाग: पुणे, बंगळूर, दिल्ली NCR मध्ये अर्बन फॉरेस्ट – वड, पिंपळ, कदंब. ऑक्सिजन लेवल वाढवायला.
म्हणजे प्रत्येक झाड “योग्य ठिकाणी, योग्य जातीचं” लावलं जातं, फक्त संख्या पूर्ण करायला झाडे लावली जात नाही.
४. आतापर्यंत किती झाडं लागली? डेटा काय सांगतो?२०२३ पासून सुरू झालेल्या या उपक्रमात आतापर्यंत ५,००,००० हून अधिक झाडे लावल्याचा दावा केला जात आहे.
५. क्रिटिसिझम आणि कॉन्ट्रोव्हर्सी: सगळंच ग्रीन आहे का?जिथे चांगलं काम, तिथे टीकाही आलीच. “Dot Ball Trees” वर पण काही मुख्य आक्षेप आहेत.
आक्षेप १: “हे Greenwashing आहे” क्रिटिक्स म्हणतात, IPL मॅचसाठी स्टेडियमचे हजारो लाईट, AC, टीमच्या चार्टर्ड फ्लाईट – याने लाखो टन CO2 निघतो. त्यामानाने २०-३० हजार झाडं म्हणजे “केकवर चिमूटभर साखर”. BCCI चं उत्तर: “मान्य आहे, पण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी सुरू केलेलं बरं. शिवाय आम्ही स्टेडियममध्ये सोलर पॅनल, रेन वॉटर हार्वेस्टिंग पण करतोय.”
आक्षेप २: “झाडं जगतात का?”प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे ती लावलेली झाडे जगतात का ? लोक म्हणतात, NGO फोटो काढून विसरून जातात. ५०% झाडं उन्हाळ्यात मरतात. रिऍलिटी: २०२४ च्या ऑडिट रिपोर्टनुसार सर्व्हायव्हल रेट ७२% आहे. कारण आता ड्रिप इरिगेशन आणि २ वर्षे देखभाल कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. १००% नाही, पण ७२% पण खूप आहे.
२०२६ मध्ये BCCI अजून २ आयडिया टेस्ट करतंय:१. “विकेट = वॉटर बॉडी”: प्रत्येक विकेटमागे १०० लिटर पाणी वाचवणारी रेन वॉटर हार्वेस्टिंग. कारण भारतात पाणी प्रॉब्लेम मोठा आहे.२. “सिक्सर = सोलर”: प्रत्येक सिक्सरमागे १ सोलर लॅम्प ग्रामीण शाळेला. बॅट्समनला पण ग्रीन क्रेडिट.जर हे सक्सेस झालं, तर २०३० पर्यंत IPL “कार्बन न्यूट्रल” लीग बनेल. म्हणजे जितका CO2 IPL मुळे निघतो, तितकाच झाडं, सोलर, पाणीमुळे वाचवला जाईल.
पुढच्या वेळी टीव्हीवर डॉट बॉल पडला आणि झाडाचं चिन्ह दिसलं, तेव्हा रिमोट बदलू नका. २ सेकंद थांबून विचार करा: बुमराहने टाकलेला तो यॉर्कर फक्त फलंदाजालाच नाही, तर राजस्थानच्या वाळवंटात एका कडुलिंबालाही जीवन देणार आहे. २० वर्षांनी त्या झाडाखाली एक शेतकरी विसावणार आहे, एक पक्षी घरटं बांधणार आहे. क्रिकेट ही बॅट-बॉलची गेम आहे. पण IPL ने दाखवून दिलं की बॅट-बॉलने निसर्ग पण वाचवता येतो. तर, आजच्या मॅचमध्ये किती झाडं लागणार? कॉमेंट्रीसोबतच Dot Ball Counter पण बघत रहा. कारण यावेळी क्रिकेट फक्त चौकार-छक्क्यांचा नाही, तर पानं-फुलांचाही आहे. 🌳 आणि आता तर अशा वृक्षारोपण मोहिमांची गरज खूपच वाढली आहे. आरे कॉलनी प्रकरण काय , आताचे ताजे ताजे नाशिक कुंभमेळा प्रकरण काय आणि अशा अजून कितीतरी घटनांमुळे निसर्गाचा जो ऱ्हास झाला आहे तो या Dot Ball Campaign

