मल्टीबॅगर डिफेन्स स्टॉक – गुंतवणूकदार झाले मालामाल

मल्टीबॅगर डिफेन्स स्टॉक
मल्टीबॅगर डिफेन्स स्टॉक

सध्या स्टॉक मार्केट चा विचार केला तर ते चांगल्याच तेजीत दिसत आहे. गेल्या काही वर्षात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातील एका सेक्टर मध्ये गुंतवणूक केली होती ती म्हणजे डिफेन्स ( संरक्षण ) सेक्टर मध्ये. आणि आता ती त्यांची गुंतवणूक चांगलीच फळाला आली आहे. एकेकाळी संथ गतीने चालणारे हे शेअर्स आता रॉकेटच्या वेगाने धावत आहेत. डिफेन्स क्षेत्रातील ZEN Technologies Ltd च्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे. अवघ्या ६ वर्षांत या शेअरची किंमत ₹२६ वरून थेट ₹१८२५ पर्यंत पोहोचली. गेल्या १ महिन्यात या शेअरमध्ये २४% पेक्षा अधिक वाढ झाली आहे. तर, एका वर्षात १८.५८% आणि पाच वर्षांत शेअर २२५७% पर्यंत वाढ झालेली दिसते. ज्या गुंतवणूकदाराने डिफेन्स सेक्टर ( संरक्षण क्षेत्रात ) गुंतवणूक केली असेल तर तो आज मालामाल झालेला दिसत आहे.

शेअर बाजारात डिफेन्स सेक्टर ने चांगलीच उसळी खाल्याने डिफेन्स सेक्टर चे स्टॉक ठरले आहेत “ Multibagger “.

मल्टीबॅगर (Multibagger) स्टॉक म्हणजे काय ?

’मल्टीबॅगर स्टॉक’ (Multibagger Stock) म्हणजे असा शेअर जो तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त परतावा (Returns) देतो. जेव्हा एखादा स्टॉक त्याच्या खरेदी किमतीपेक्षा १००% पेक्षा जास्त वाढतो, तेव्हा त्याला ‘मल्टीबॅगर’ म्हणायला सुरुवात होते. जेव्हा एखादा स्टॉक त्याच्या खरेदी किमतीपेक्षा १००% पेक्षा जास्त वाढतो, तेव्हा त्याला ‘मल्टीबॅगर’ म्हणायला सुरुवात होते.

मल्टीबॅगर हा शब्द कुठून आला ?

‘मल्टीबॅगर’ हा शब्द प्रसिद्ध गुंतवणूकदार पीटर लिंच (Peter Lynch) यांनी त्यांच्या ‘One Up on Wall Street’ या पुस्तकात पहिल्यांदा वापरला होता. लिंच यांनी गुंतवणुकीतील नफ्याची तुलना बेसबॉलमधील ‘बेसेस’शी केली. या बसेस ला ‘ बॅगर’ म्हणतात.

पीटर लिंच यांचे पुस्तक
पीटर लिंच यांचे पुस्तक

डिफेन्स स्टॉक्स म्हणजे काय?

डिफेन्स स्टॉक्स म्हणजे अशा कंपन्यांचे शेअर्स जे देशाच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित उत्पादने किंवा सेवा देतात. ज्या कंपन्या देशाच्या संरक्षणासाठी लागणारी उपकरणे तयार करतात, त्यांना डिफेन्स स्टॉक म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या कंपन्या येतात:

सरकारी कंपन्या (PSUs): जसे की HAL (फायटर जेट्स), माझगाव डॉक (पाणबुड्या), BEL (रडार आणि इलेक्ट्रॉनिक्स).

खाजगी कंपन्या: टाटा डिफेन्स, एल अँड टी (L&T), भारत फोर्ज यांसारख्या कंपन्या ज्या आता मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य बनवत आहेत.

मल्टीबॅगर स्टॉक होण्याची कारणे

१. दीर्घकालीन मागणी (Long-term Demand)- देशाच्या सुरक्षेसाठी डिफेन्स खर्च सतत वाढत असतो. जेव्हा सरकार एखाद्या कंपनी ला मोठ्या प्रमाणात ऑर्डर देते तेव्हा त्या कंपनीचा नफा वाढतो आणि आपसुकच शेअर ची किंमत वाढते.

२. मजबूत ऑर्डर बुक – कंपन्यांकडे अनेक वर्षांचे ऑर्डर बुक असते. एखाद्या कंपनीने सरकारची मागणी चांगल्या प्रकारे पूर्ण केल्यास सरकार पुन्हा पुन्हा त्याच कंपनीकडे त्या प्रॉडक्ट साठी मागणी देऊन ठेवते.

३. कमी स्पर्धा – डिफेन्स सेक्टरमध्ये एंट्री बॅरिअर्स जास्त असल्यामुळे स्पर्धा कमी असते. संरक्षण उपकरणे बनवणारी कंपनी भारतात कमी असल्याने स्पर्धा कमी होते.

४. निर्यात (Exports) मध्ये वाढ – भारत आता केवळ स्वतःसाठी शस्त्रे बनवत नाही, तर फिलिपिन्स, आर्मेनिया आणि आफ्रिकन देशांना ब्राह्मोस मिसाईल्स आणि आर्टिलरी गन्स निर्यात करत आहे. त्यामुळे परकीय चलन मिळते आणि शेअर ला चालना मिळते.

डिफेन्स स्टॉक मध्ये गुंतवणूक करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

डिफेन्स स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर असले तरी काही धोकेही लक्षात घेतले पाहिजेत:

• व्हॅल्युएशन (Valuation): अनेक डिफेन्स स्टॉक्स सध्या खूप महाग झाले आहेत (High P/E Ratio). त्यामुळे एकदम मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी SIP मार्गाने गुंतवणूक करणे चांगले.

• सरकारी धोरणे: हे क्षेत्र पूर्णपणे सरकारच्या निर्णयांवर अवलंबून असते. त्यामुळे सरकारी धोरणात बदल झाल्यास स्टॉकवर परिणाम होऊ शकतो.

• प्रकल्पांना होणारा उशीर: संरक्षण प्रकल्प क्लिष्ट असतात, त्यामुळे त्यांना पूर्ण होण्यास उशीर झाल्यास कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होतो.

गुंतवणूकदारांनी या सर्व बाबींचा विचार करून मग डिफेन्स स्टॉक मध्ये गुंतवणूक केलेले चांगले. मल्टीबॅगर डिफेन्स स्टॉक्स हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. भारताचा डिफेन्स सेक्टर वेगाने वाढत आहे आणि सरकारचा मजबूत पाठिंबा असल्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत.तथापि, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचा अभ्यास (Research) करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास डिफेन्स स्टॉक्स तुम्हाला मल्टीबॅगर परतावा देऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *