
NEET पेपर फुटीप्रकरणी देशभरातून CJP ची तीव्र लाट उसळल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इच्छा नसताना देखील त्यांच्या पदाचा राजीनामा मंजूर केला. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्या नंतर आताचे शिक्षण मंत्री आहेत प्रल्हाद जोशी.
कोण आहेत प्रल्हाद जोशी ?
भारतातील राजकारणात असे काही नेते असतात जे गाजावाजा न करता, शांतपणे पण ठामपणे आपली ओळख निर्माण करतात. कर्नाटकच्या उत्तर भागातील धारवाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आणि सध्या केंद्रातील महत्त्वाची खाती सांभाळणारे *प्रल्हाद व्यंकटेश जोशी* यांची राजकीय वाटचाल नेमकी अशीच आहे.
प्रल्हाद वेंकटेश जोशी यांचा जन्म २ नोव्हेंबर १९६२ रोजी कर्नाटकच्या विजापूर (सध्याचे विजयपुरा) जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण हुबळी (Hubballi) येथे झाले. हुबळी हे कर्नाटकचे एक महत्त्वाचे व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र आहे. याच शहराने त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. प्राथमिक शिक्षण रेल्वे शाळेत आणि माध्यमिक शिक्षण हुबळीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी हुबळी येथील श्री कडसिद्धेश्वर आर्ट्स कॉलेजमधून बी.ए. ची पदवी घेतली. लहानपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि संघाच्या विविध प्रशिक्षण शिबिरांमध्ये सहभागी झाले होते.

राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी १९८६ मध्ये ‘विभव केमिकल’ नावाचा लघुउद्योग सुरू केला होता. म्हणजे ते मूळचे उद्योगपती आहेत.
प्रल्हाद जोशी यांचे नाव पहिल्यांदा १९९२ ते १९९४ मध्ये चर्चेत आले. त्यावेळी हुबळी-कर्नाटकच्या ईदगाह मैदानावर तिरंगा झेंडा फडकवण्याचे आंदोलन त्यांनी आयोजित केले होते. या मैदानाला कित्तूर राणी चेन्नम्मा मैदान असेही म्हणतात. या आंदोलनात उमा भारती यांच्यासोबत त्यांनी नेतृत्व केले होते. त्याच काळात त्यांनी “कश्मीर बचाओ आंदोलन” चेही नेतृत्व केले. या दोन आंदोलनांमुळे ते उत्तर कर्नाटकमध्ये भाजपचे एक परिचित चेहरे बनले. त्यानंतर त्यांची धारवाड जिल्हा भाजप अध्यक्षपदी निवड झाली.
२००४ मध्ये प्रल्हाद जोशी यांनी धारवाड मतदार संघातील १४ व्या लोकसभेची निवडणूक लढवून खासदार म्हणून निवडून आले. धारवाड च्या जनतेतील विश्वासामुळे ते २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग पाच लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवून विजयाची पंचरंगी हॅटट्रिक त्यांनी साधली आहे.
२०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले आणि त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाची खाती सोपवण्यात आली. जसे की संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री, खाण मंत्री.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (New and Renewable Energy) यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली. देशातील अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरणे आखणे आणि देशाच्या हरित ऊर्जा (Green Energy) लक्ष्यांच्या पूर्ततेसाठी ते सध्या कार्यरत आहेत. अन्नपदार्थांमधील भेसळीबाबत सरकार तातडीने कारवाई करत असल्याचे त्यांनी लोकसभेत सांगितले होते. FSSAI च्या २४२ प्रयोगशाळा आणि भ्रमणध्वनी प्रयोगशाळा यासाठी कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आणि आता जुलै २०२६ मध्ये NEET आणि NTA (National Testing Agency ) च्या कारभारावरून टीका झाल्यानंतर आणि धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे शिक्षण मंत्री पदाचा अतिरिक्त कारभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या प्रल्हाद जोशी हे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, ऊर्जा आणि शिक्षण या चारही खात्यांच्या मंत्रीपदाची भूमिका सांभाळणार आहेत.

राजकारणात अनेकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते, परंतु जोशी हे अत्यंत शांत आणि संयमी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर कधीही कोणताही मोठा भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. त्यामुळे शिक्षणासारखा संवेदनशील विषय त्यांनी तेवढाच शांतपणे सांभाळावा अशी अपेक्षा.

