चिंचेच्या बियांचे (Imli Seeds) आच्छर्यकारक फायदे

चिंचेच्या बियांचे फायदे

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच झाली आहे. आधीच्या लेखात आपण बहुगुणी भृंगराज या विषयी जाणले. या लेखात आपण चिंचेच्या बियांचे महत्व जाणून घेणार आहोत. चिंच म्हटले की तोंडाला पाणीच सुटते. आंबट गोड खायला एकदम चटकदार… कोणालाही हवीहवीशी आणि खावी वाटणारी चिंच.. चिंच कधी अशीच नुसती खाल्ली जाते किंवा जास्त करून जेवणात शिजवून किंवा अन्नपदार्थात टाकली जाते. चिंच ही आपल्या जेवणात आंबट-गोड चव आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आमटी, रस्सा किंवा चटणी चिंचोके वापरून बनवले जाणारे पदार्थ अत्यंत आवडीने खाल्ले जातात. औषध म्हणून किंवा घरगुती कामांसाठी देखील चिंच वापरली जाते. चिंचेमध्ये भरपूर महत्त्वाची पोषक तत्वे असतात. चिंचेमध्ये भरपूर महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि खनिजे तर असतातच, शिवाय ती फायबर, प्रथिने आणि चरबीचा एक नैसर्गिक स्रोत देखील आहे.

चिंचेच्या गरामध्ये कोणती पोषक तत्वे असतात ?

चिंचेच्या गरामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी १ (थायमिन), व्हिटॅमिन बी २ (रायबोफ्लेविन),व्हिटॅमिन बी 3 (नियासिन), व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन के यांसारख्या इतर आवश्यक जीवनसत्त्वांचे अंश आढळतात. चिंचेतून जरी भरपूर आरोग्यदायी पोषक तत्वे मिळत असली तरी, त्यातील साखरेच्या उच्च प्रमाणाबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. कारण चिंचेमध्ये कर्बोदके असू शकतात, आणि ही सर्व कर्बोदके साखरेपासून मिळतात. जरी हा साखरेचा एक नैसर्गिक स्रोत असला तरी, आपल्या दैनंदिन जीवनात मर्यादेतच त्याचे सेवन करणे गरजेचे आहे.

चिंचेच्या गराचे आपल्याला भरपूर फायदे माहिती आहेत. पण चिंचेच्या बियांचे देखील फायदे असतात हे खूप कमी लोकांना माहिती असते. जेव्हा आपण चिंच खातो, तेव्हा तिचा गर वापरल्यानंतर आपण सहजपणे तिच्या कडक बिया फेकून देतो. परंतु, ज्या बिया आपण कचरा समजून कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो, त्या प्रत्येक बी मध्ये आरोग्याचा आणि उद्योगांचा एक अमूल्य खजिना लपलेला आहे हे आपल्याला माहीतच नसते.

चिंचेच्या बिया
चिंचेच्या बिया

चिंचेच्या बियांचा (Imli Seeds) वापर विविध कारणांसाठी केला जातो. आयुर्वेदात, अन्न उद्योगात आणि घरगुती उपयोगांमध्ये याचे अनेक फायदे आहेत.

१. आरोग्यासाठी आणि आयुर्वेदातील चिंचेच्या बियांचे महत्त्व :

आयुर्वेदात चिंचेच्या बियांना विशेष स्थान आहे. केवळ फळच नव्हे, तर या कडक बिया अनेक आजारांवर मात करण्यासाठी अत्यंत गुणकारी मानल्या जातात.

सांधेदुखी आणि टाचदुखीवर चिंचेच्या बियांचा रामबाण उपाय:

आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे सांधेदुखी, गुडघेदुखी आणि टाचदुखीचा त्रास लहान वयापासूनच अनेकांना जाणवू लागला आहे. अशा वेळी चिंचेच्या बियांचा उपयोग वरदान ठरतो. या बियांचे आवरण (कडक टरफल) काढून आतील गर बारीक करून त्याचे चूर्ण (पावडर) बनवले जाते. हे चूर्ण सकाळी कोमट पाण्यासोबत किंवा साखरेसोबत घेतल्यास सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.

गुडघ्यांचे ग्रीस वाढवणे:

वय किंवा इतर कारणांमुळे गुडघ्यांमधील सांध्यांचे वंगण (Synovial Fluid) कमी होते, ज्यामुळे चालताना हाडे घासला जाऊन वेदना होतात. पारंपारिक वैद्यकीय सल्ल्यानुसार, चिंचेच्या बियांच्या सेवनामुळे हाडांमधील कडकपणा कमी होण्यास आणि सांध्यांची लवचिकता टिकून राहण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारणे:

पोटाचे विकार जसे की अपचन किंवा अतिसार (Diarrhea) यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिंचेच्या बियांचा वापर केला जातो. यामध्ये टॅनीन (Tannins) नावाचे घटक असतात, जे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

मधुमेह नियंत्रण (Diabetes Control):

काही वैद्यकीय संशोधनानुसार, चिंचेच्या बियांमध्ये रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) नियंत्रित ठेवण्याचे गुणधर्म असतात. यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत होते.

२. व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात प्रचंड मागणी :

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, परंतु चिंचेच्या बियांचा वापर केवळ घरगुती उपायांपुरता मर्यादित नसून मोठ्या उद्योगांमध्ये याचे महत्त्व सोन्यासारखे आहे.

टेक्सटाईल (कापड) उद्योग: कापड निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये धाग्यांना मजबूती आणण्यासाठी आणि स्टार्च करण्यासाठी चिंचेच्या बियांच्या पावडरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कपड्यांना योग्य आकार आणि कडकपणा देण्यासाठी ही पावडर अत्यंत उपयुक्त ठरते.

कागद उद्योग: कागद बनवताना लगद्यामध्ये योग्य तो चिकटपणा आणि गोलाई आणण्यासाठी चिंचेच्या बियांच्या अर्काचा वापर केला जातो. यामुळे कागदाची गुणवत्ता सुधारते.

अन्न प्रक्रिया उद्योग (Food Additives): चिंचेच्या बियांपासून मिळणाऱ्या डिंकाला ‘Tamarind Kernel Powder’ (TKP) म्हटले जाते. हा डिंक अन्न उद्योगात एक उत्तम थिकनर (Thickener) आणि स्टेबिलायझर (Stabilizer) म्हणून काम करतो. आईस्क्रीम, जेली, सॉस, पॅकेज्ड सूप आणि विविध प्रकारच्या ग्रेव्हीजमध्ये घट्टपणा आणण्यासाठी याचा वापर केला जातो.

चामडे कमावणे (Leather Tanning): चामड्याच्या उद्योगात चामडे मऊ करण्यासाठी आणि त्यावर प्रक्रिया करताना रंगकाम सुरळीत पार पाडण्यासाठी या बियांच्या घटकांचा वापर केला जातो.

३. कृषी क्षेत्र आणि बागकाम

जर तुम्हाला झाडे लावण्याची आवड असेल, तर चिंचेच्या बिया तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.नवीन रोपे तयार करणे:चिंचेच्या बिया जमिनीत पुरून त्यांची उत्तम रोपे तयार केली जातात. ही रोपे नंतर मोठी होऊन मोठे चिंचेचे वृक्ष बनतात. बियांची लागवड करताना जर त्या काही वेळ पाण्यात भिजवून ठेवल्या किंवा हलक्या भाजून घेतल्या, तर त्या जलदगतीने अंकुरतात. शेतकरी आणि रोपवाटिका चालवणारे लोक उत्तम प्रतीची चिंचेची कलमे तयार करण्यासाठी याचा वापर करतात.

तुम्हाला जर चिंचेच्या बिया पाहिजे असतील तर त्या तुमच्या किराणामालाच्या दुकानात मिळू शकतील. किंवा आजकालच्या ऑनलाईन च्या जमान्यात त्या तुम्हाला ऑनलाईन साइट वर देखील मिळू शकतील. Filpkart वर तुम्ही जाऊन चिंचेच्या बिया घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *