
सध्याच्या AI च्या स्पर्धात्मक युगात बिझनेस चालवणं जेवढे सोपे झाले आहे तितकेच ते नीट manage करणं तेवढेच कठीण देखील झाले आहे. सध्यातरी freelancing Business खूप वाढत चालले आहेत. कुठलाही बिझनेस एकट्याच्या खांद्यावर मोठा होत नाही. त्याला कच्चा माल (Raw material) म्हणा किंवा तांत्रिक सेवा (Technical service) किंवा अजून काही न काही ची आवश्यकता असते. याच सर्व गरजांसाठी आपण Vendors म्हणजेच या गोष्टी पुरवणाऱ्यांवर अवलंबून असतो. पण जेव्हा हीच वेंडर्सची संख्या वाढते, तेव्हा त्यांचे व्यवस्थापन करणे म्हणजे manage करणे कठीण होते. त्यासाठी Vendor Management Software (VMS) महत्वाची भूमिका पार पाडतो.
Vendor Management System (VMS) म्हणजे काय?
सध्याच्या डिजिटल युगात कंपन्या अनेक vendors म्हणजेच पुरवठादार सोबत काम करतात. वेंडर मॅनेजमेंट सॉफ्टवेअर (VMS) हे एक असे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे कंपनी आणि तिचे पुरवठादार यांच्यातील काम सोपं करते. म्हणजेच या सॉफ्टवेअर द्वारे कंपनीला त्यांच्या vendors सोबतचे सर्व काम एकाच ठिकाणी manage करण्यास मदत होते. यात तुम्ही vendor details, contracts, payments, performance सर्व काही track करू शकता. कोणाचे कॉन्ट्रॅक्ट कधी संपणार आहे, कोणाचे किती पेमेंट बाकी आहे, कुठल्या vendor चे काम कसे आहे हे सगळं तुम्ही यात पाहू शकता.
Vendor Management Software कसे काम करते?

१. Vendor Data Management (माहिती साठवणे) – Vendor चे नाव, contact details मिळतात तसेच GST No. PAN no. आणि इतर डॉक्युमेंट ही दिसतात. शिवाय त्या vendors च्या आधीच्या कामाची history पण दिसते.
२. Vendor add करणे – नवीन vendor register करणे त्याचे Documents verify करणे ,Approval process automatic करणे त्यामुळे आपला वेळ वाचतो.
३. Contract Management – VMS हे Vendor सोबतचे agreements store करणे, Contract expiry date track करणे, आणि जर ते एक्स्पायर होत आल्यास Renewal reminders देखील देते. त्यामुळे आपण जरी contract ची तारीख विसरलो तरी VMS आपल्याला आठवण करून देते.
४. Payment & Invoice Management – Vendor invoices track करणे, Payment due dates manage करणे Automatic billing system ही सगळी कामं VMS करतो.
५. Risk & Compliance Management – हा खूप महत्वाचा मुद्दा आहे business मध्ये. कारण खूप vendors फसवे देखील असतात. त्यामुळे vendor legal आहे का? त्याच्याकडे हवे असलेले licensed आहे का? हे बघण्याचे काम VMS करतो. त्यामुळे Vendors बाबतची risk थोडी कमी होते.
VMS कोणासाठी उपयोगाचे आहे ?
वेंडर मॅनेजमेंट सॉफ्टवेअर (VMS) चा वापर केवळ मोठ्या कंपन्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आजच्या काळात छोटे-मोठे व्यवसाय देखील त्यांचे काम सोपे करण्यासाठी याचा वापर करत आहेत.
१. उत्पादन कंपन्या (Manufacturing Companies) – ज्या कंपन्या वस्तू तयार करतात, त्यांना कच्च्या मालासाठी शेकडो वेंडर्सवर अवलंबून राहावे लागते. मालाची गुणवत्ता, डिलिव्हरीची वेळ आणि पेमेंटचा मागोवा घेण्यासाठी या कंपन्यांना VMS हे चांगलेच फायदेशीर ठरू शकते.
२. आयटी आणि सॉफ्टवेअर कंपन्या (IT Companies) – आयटी क्षेत्रात अनेकदा बाह्य सॉफ्टवेअर लायसन्स, क्लाउड सर्व्हिसेस, फ्रीलान्सर्स आणि कन्सल्टंट्सकडून सेवा घेतल्या जातात. या सर्व डिजिटल सेवांचे व्यवस्थापन करण्यासाठी VMS वापरले जाते.
३. बांधकाम आणि रिअल इस्टेट (Construction & Real Estate) – बांधकाम क्षेत्रात सिमेंट, स्टील, वीज उपकरणे पुरवणारे अनेक वेंडर्स आणि कंत्राटदार असतात. प्रकल्पाचा खर्च बजेटमध्ये ठेवण्यासाठी आणि साहित्याचा पुरवठा वेळेवर होण्यासाठी याचा वापर होतो.
४. किरकोळ आणि ई-कॉमर्स (Retail & E-commerce) -Amazon किंवा Flipkart सारखी मोठी प्लॅटफॉर्म्स किंवा स्थानिक रिटेल चेन हजारो विक्रेत्यांकडून (Sellers) माल घेतात. कोणाकडे किती स्टॉक आहे आणि कोणाला किती पैसे द्यायचे आहेत, हे समजण्यासाठी VMS आवश्यक आहे.
५. बँकिंग आणि आर्थिक संस्था (BFSI) – बँकांना सुरक्षेसाठी आणि तांत्रिक कामासाठी अनेक बाह्य संस्थांची मदत घ्यावी लागते. डेटा सुरक्षा आणि सरकारी नियमांचे पालन (Compliance) करण्यासाठी बँका या सॉफ्टवेअरचा वापर करतात.
६. इव्हेंट मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी (Event Management) – मोठ्या कार्यक्रमांसाठी कॅटरिंग, डेकोरेशन, लॉजिस्टिक्स आणि साउंड सिस्टिम पुरवणारे अनेक लोक असतात. एकाच वेळी या सर्व सेवांचे नियोजन करण्यासाठी VMS उपयुक्त ठरते.
७. स्टार्टअप्स आणि छोटे व्यवसाय (SMEs) – आजकाल अनेक ‘SaaS’ (Software as a Service) आधारित स्वस्त VMS उपलब्ध आहेत. त्यामुळे छोटे व्यवसाय देखील मॅन्युअल चुका टाळण्यासाठी आणि व्यावसायिकता जपण्यासाठी याचा वापर करत आहेत.
VMS पुरवणाऱ्या कंपन्या कोणत्या ?
वेंडर मॅनेजमेंट सॉफ्टवेअर (VMS) पुरवणाऱ्या कंपन्यांचे त्यांच्या कामाच्या व्याप्तीनुसार आणि व्यवसायानुसार काही गट पाडता येतात. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा आकार आणि गरजेनुसार योग्य कंपनी निवडू शकता:
१. जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्या (Enterprise Level) – या कंपन्या मोठ्या बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन्ससाठी उपयुक्त आहेत जिथे हजारो वेंडर्स असतात. * SAP Ariba: – हे जगातील सर्वात लोकप्रिय VMS पैकी एक आहे. पुरवठा साखळी आणि खरेदी (Procurement) प्रक्रियेसाठी हे उत्तम मानले जाते. * Oracle NetSuite: – हे एक सर्वसमावेशक ERP आहे ज्यामध्ये वेंडर मॅनेजमेंटचे उत्कृष्ट मॉड्यूल मिळते. * Coupa: – हे प्रामुख्याने ‘स्पेंड मॅनेजमेंट’ (खर्च व्यवस्थापन) आणि वेंडर संबंधांसाठी ओळखले जाते.
२. मध्यम आणि छोट्या व्यवसायांसाठी (SMEs & Startups) – जर तुमचा व्यवसाय मध्यम स्वरूपाचा असेल आणि तुम्हाला वापरण्यास सोपे सॉफ्टवेअर हवे असेल, तर हे पर्याय उत्तम आहेत: * Freshworks (Freshservice): – भारतीय वंशाची ही कंपनी सोपे आणि प्रभावी वेंडर मॅनेजमेंट टूल्स पुरवते. * Zoho Inventory / Zoho Books: – भारतीय बाजारपेठेत अत्यंत लोकप्रिय. यामध्ये वेंडर बिलिंग आणि स्टॉक मॅनेजमेंट सहज करता येते. * Gatekeeper: – हे विशेषतः कॉन्ट्रॅक्ट्स आणि वेंडर डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते.
३. विशिष्ट गरजांसाठी (Specialized VMS) – काही सॉफ्टवेअर्स विशिष्ट कामांसाठी बनवलेली असतात: * Beeline: – जर तुम्हाला वेंडरकडून मनुष्यबळ (Staffing) पुरवले जात असेल, तर हे सॉफ्टवेअर उत्तम आहे. * Precoro: – छोट्या कंपन्यांना खरेदी प्रक्रिया (Purchase Orders) सुलभ करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
Vendor Management Software हे प्रत्येक growing business साठी आवश्यक tool बनत आहे. जर तुम्हाला vendors efficiently manage करायचे असतील, तर VMS वापरणे खूप फायदेशीर आहे.

