
सोशल मीडियावर सध्या जरा एका गोष्टीची चर्चा चालू आहे ती म्हणजे #slumdogmillionaire ची. काय आहे हे #slumdogmillionaire . तर ही एक Instagram पोस्ट आहे. यात मग एवढे खास काय. तर या पोस्ट मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींना गरीब म्हणून दाखवण्यात आलेले आहे. तर ही छायाचित्रे बनवली आहेत गोकुळ पिल्लई याने. मिडजर्नी नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्रॅमचा वापर करून ही छायाचित्रे केवळ मनोरंजन म्हणून बनवली गेली आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेंड सध्या खूप व्हायरल होत आहे आणि सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. तर गोकुळ पिल्लई याने या त्याच्या Instagram पोस्ट मध्ये सात अशे अब्जाधीश लोकांची छायाचित्रे घेतली आहेत ज्यात आपण त्यांना गरीब जीवन जगताना बघितले तर ते कसे दिसतील ते या #slumdogmillionaire या पोस्ट मध्ये आपल्याला बघायला मिळते.
तर कोण आहेत हे अब्जाधीश गरीब लोक
A post shared by Gokul Pillai (@withgokul)
या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, मुकेश अंबानी, मार्क झुकेरबर्ग, वॉरेन बफे, जेफ बेजोस आणि एलन मस्क यांचा समावेश आहे. या फोटोंमध्ये ही अब्जाधीशांनी लोकं फाटलेले आणि जुने कपडे परिधान केलेले दिसत आहेत. बॅकग्राऊंडमध्ये झोपडपट्टीचा परिसर दिसतो. हे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यापासून या पोस्ट ला आतापर्यंत सोळा हजारच्या वर लाईक्स मिळाले आहेत. त्यातला मुकेश अंबानी यांचा फोटो फारच मजेशीर दिसतो.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI )इतकी प्रगत झाली आहे की, फारसे कष्ट न घेता लोक यात आश्चर्यकारक चित्रे बनवू लागले आहेत. त्यामुळे AI झालेले फोटो इतके खरे वाटतात की ते खोटे आहेत किंवा बनवलेले आहेत असे कळून येत नाही.
काय आहे मिडजर्नी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( Midjourny Artificial intelligence )
Midjourny AI हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोग्राम आहे जो Midjourny टीम च्या अंतर्गत विकसित केला गेला आहे. Midjourny हे एक आर्ट जनरेटर आहे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित आहे. आपण कितीवेळा बघितले आहे आपण फोटो क्रॉप करतो किंवा फोटोशॉप चा वापर करून इमेज बनवतो किंवा एखादा कलाकार आपली कला आपल्या चित्रात उतरवतो. तसेच हे midjourny AI program आपल्यासाठी करते. त्याला फक्त आपण सांगायचे असते की आपल्या डोक्यात काय आहे किंवा आपल्याला काय पाहिजे याची आपल्याला फक्त त्याला कमांड द्यायची असते. मग तो आपली कल्पनाशक्ती सत्यात उतरवतो.
Artificial Intelligence (AI) इमेज क्रिएटर हे आधुनिक तंत्रज्ञान असलेले Midjourny रिसर्च लॅब सारख्या काही संस्थांनी तयार केले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे आपण पाहिजे त्या इमेज तयार करू शकतो. अशा AI इमेज चा वापर करून आपण आपल्या कल्पनाशक्ती च्या आधारे हव्या त्या इमेज बनवू शकतो. मग ते काही भयानक असो वा काही खूप सुंदर असे जे कोणी आजतागत पाहिलेले नसेल.
Midjourny च्या काही इमेजेस आपण बघू.


यात वापरकर्ते डिस्कॉर्ड बॉट (Discord Bot )कमांड वापरून मिडजॉर्नीने आर्टवर्क तयार करतात.
मग हे Discord Bot काय आहे ?

Discord bot हे Discord नावाच्या मल्टीप्लेटफॉर्म चॅट ऍप वर वापरला जाणारा एक प्रोग्राम आहे. हे एक ऑटोमेटेड बॉट आहे जो वापरकर्त्यांना विविध सेवा देण्यासाठी वापरले जाते. डिस्कॉर्ड वापरकर्ते विविध समुदाय आणि सर्वेक्षणांसह चॅट करतात आणि डिस्कॉर्ड बॉट यांच्या माध्यमातून आपल्या चॅट अनुभवाला बेहतर बनवू शकतात. डिस्कॉर्ड बॉट आपल्याला विविध कामांमध्ये मदत करू शकते जसे की संगीत वाचणे, सूचना शोधणे, मनोरंजन, सेवा तपासणी आणि अधिक. डिस्कॉर्ड बॉट हे विविध प्रोग्रामिंग भाषांमध्ये व्हिडीओ गेम, वॉयस चॅट आणि टेक्स्ट चॅट यासारख्या अंतर्निहित विविध सुविधा देण्यासाठी वापरले जाते.
मग आपल्या कल्पनाशक्तीचा जोरावर आपणही अशा AI इमेज बनवून बघू.
